पुनर्विकासात बहुमजली कॉर्नकोर्स उभारणार
मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वे एकत्र येत असलेल्या आणि अत्यंत दाटीवाटीच्या ठिकाणी असलेल्या दादर स्थानकाच्या पुनर्विकासाला मंजुरी देण्यात आली आहे. सीएसएमटी स्थानकापाठोपाठ दादर, भायखळा तसेच अन्य स्थानकांचा रेल्वे जमीन विकास प्राधिकारणांकडून विकास केला जाणार असल्याची माहिती महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी दिली.
दादर रेल्वे स्थानकात एकूण १५ प्लॅटफॉर्म असून पश्चिम रेल्वेवर सात प्लॅटफॉर्म आहेत. त्यातील धीम्या लोकलचे तर तीन प्लॅटफॉर्म जलद लोकलसाठी तर शेवटचे दोन प्लॅटफॉर्म लोकल व लांब पल्ल्यांच्या ट्रेनसाठी वापरले जातात. उरलेले आठ प्लॅटफॉर्म मध्य रेल्वेवर आहेत. त्यातील तीन धीम्या मारिकेसाठी तर तीन प्लॅटफॉर्म जलद लोकलसाठी तर शेवटचे दोन लांब पल्ल्यांच्या गाड्यांसाठी वापरले जातात. दादर स्थानकात मध्य लोकलबरोबरच पपश्चिम रेल्वेची स्थानके येथे एकत्र येत असून लोकलबरोबरच लांब पल्ल्याचे टर्मिनसही येथे आहे. तर सणासुदीला तसेच राजकीय सभांच्या वेळी हि संख्या आठ लाखांच्या पुढे जाते.
दादर स्थानकातील गर्दीचे समान वितरण व्हावे, पादचारी व प्रवाशांना कोणताही त्रास न होता त्यांचे आगमन व निर्गमन व्हावे असा दादर स्थानकाच्या पुनर्विकासाचा हेतू आहे. तसेच स्थानकाबाहेरील आत आणि बाहेर पडण्याच्या मार्गावरील कोंडी दूर करणे आवश्यक होते.
0 टिप्पण्या