Ticker

6/recent/ticker-posts

शाळा तूर्त बंदच!

मुंबई, ठाणे, नवी मुंबईत पहिली ते सातवीचे विद्यार्थी घरातच

मुंबई : केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडविया तसेच राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे हे दोघेही, 'देशात राज्यात व ओमायक्रॉनचा एकही रुग्ण सापडलेला नाही... विनाकारण दहशतीखाली राहू नका,' असा धीराचा सूर लावत असतानाच आज बुधवारपासून सुरू होण्याची आशा असलेल्या राज्यातील शाळा अनेक शहरांत बंदच राहतील, हे स्पष्ट झाले आहे व ओमायक्रोनची धास्ती त्यास कारणीभूत ठरली आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नाशिक आदी शहरांतील इयत्ता पहिली ते इयत्ता सातवीच्या शाळा आता १५ डिसेंबर वा त्यानंतरच सुरू होऊ शकतील.

हो ओमायक्रॉनच्या चर्चेच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईचे महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल आणि शालेय शिक्षणाचे संबंधित अधिकाऱ्यांनामध्ये मंगळवारी महत्त्वाची बैठक झाली या बैठकीत शाळा १ डिसेंबर ऐवजी १५ डिसेंबर रोजी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.






फोटो : व्हायरल 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या