मुंबई : साकी विहार रोडवरील साई ऑटो ह्युंडाईच्या सर्व्हिस सेंटरला काल (१८ नोव्हेंबर) सकाळी ११ वाजता लागलेल्या आगीचे लोट दूरवर पसरले होते. त्यामुळे परिसरतील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. येथील कामगार व शेजारील इमारतीतील नागरिक वेळीच बाहेर पडल्याने मोठी जीवितहानी टळली. अग्निशमन दलाने प्रसंगावधान राखून आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, या आगीच्या भक्ष्यस्थानी महागड्या गाड्या जळून खाक झाल्या.
0 टिप्पण्या