तूर्तास आरोग्य मंदिरे आवश्यक आहेत ती उघडणार
मुंबई : मंदिरे उघडायची की आरोग्य मंदिरे असा सवाल विरोधकांना करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी स्पष्ट सांगितले की, सध्या आरोग्य मंदिरे उघडले जातील, आम्ही मंदिर उघडणार आहोत पण टप्प्याटप्प्याने!
कोविडचा काळ अद्याप ओसरलेला नाही. जबाबदारीने वागा, असे मंगळवारीच मी सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. जबाबदारीने आपण वागलो नाही तर लोक कसे वागतील...? हे मी त्यांना सांगितले आहे. आज मंदिरे जरी बंद असले तरी ही आरोग्य मंदिरे असेच ज्यांचे वर्णन केले पाहिजे ती रुग्णालये सुरू आहेत. रुग्णालयाच्या माध्यमातून ही आरोग्य मंदिरे सुरू आहेत त्यामुळे जनता आशीर्वाद देणार आहे. आरोग्य केंद्र महत्त्वाचे आहेत ते बंद करून मंदिर उघडायचे का...? आम्ही मंदिरे उघडणार आहोत पण काही गोष्टी टप्प्याटप्प्याने करणार आहोत असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा