लहान भावाला घरात न घेतल्याचा पित्याला राग, पोलिसांकडून अटक
मुंबई, दादासाहेब येंधे : लहान भावाला घरात घेतले नाही याचा राग आल्याने पित्याने पंधरा वर्षांच्या मुलीला चामडी पट्ट्याने मारहाण केल्याची घटना रविवारी दुपारी घडली. याबाबत मुलीने चुनाभट्टी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असता तिच्या पित्याला अटक करण्यात आली आहे. महेंद्र शिवाजी इतापे (वय ४७) असे अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे.
चेंबूर येथील लाल डोंगर परिसरातील अल्टाविस्ता इमारतीत तक्रारदार मुलगी प्रेरणा महिंद्रा इथापे आपल्या आई-वडिलांसोबत राहते. शनिवारी सकाळी लहान भाऊ तीर्थराज याने झोपेत लघवी केली होती. आई रागवेल या भीतीने तो घरातून बाहेर पळून गेला. आई-वडील घराची चावी देऊन भावाला घरात घे, असे सांगून आजीला उपचाराकरता केईएम रुग्णालयात घेऊन गेले. मुलीने पिण्याचे पाणी भरले. घरातील साफसफाई केली. त्यानंतर ती अभ्यास करण्यास बसली. परंतु, लहान भावास घरात घेण्यास ती विसरली. आई वडील घरी आल्यानंतर मुलगा घराबाहेर नग्न स्थितीत फिरत असल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. रागाच्या भरात पित्याने तिला हाताने व चामडी पट्ट्याने मारहाण केली व दोनदा उचलून खाली आपटले.

0 टिप्पण्या