मुंबई : भारताच्या स्वातंत्र्याच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबई उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश दिपांकर दत्ता यांच्या हस्ते व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. या समारंभास श्रीमती रश्मी ठाकरे, मुख्य सचिव सिताराम कुंटे, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, उच्च न्यायालयाचे अधीकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते. कोरोनाविषयक नियमांचे पालन करुन मर्यादीत उपस्थितीत कार्यक्रम साजरा करण्यात आला.
मुख्यमंत्री
सहायता निधीस 3 कोटी 41 लाख रूपयांची मदत
ध्वजारोहण कार्यक्रमानंतर मुंबई उच्च
न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 3
कोटी 41 लाख 98 हजार 597 रूपयांचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे
सुपूर्त केला. राज्य सरकार करीत असलेल्या कोविडच्या लढाईत न्यायालयाच्या सामजिक
जबाबदारीचा हा भाग आहे असे त्यांनी म्हटले. मुंबई उच्च न्यायालयाचे सर्व न्यायिक
अधिकारी, जिल्हा न्यायाधीश तसेच न्यायालयीन कर्मचारी यांचे यात योगदान आहे.

0 टिप्पण्या