विक्रोळीत तरुणींची भररस्त्यात फ्री स्टाईल मारामारी
मुंबई, दादासाहेब येंधे : तो माझा बॉयफ्रेंड होता. तू मध्ये का पडलीस..? त्याच्यासोबत
का फिरतेस, असे सवाल करीत एक तरुणी मैत्रिणी सोबत दुसऱ्या तरुणीवर तुटून पडली आणि विक्रोळी पूर्व येथील द्रुतगती मार्गाच्या सर्व्हिस रोडवर झालेल्या या फ्री स्टाईल मारामरीचा व्हिडिओ शुक्रवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला.
सदर व्हिडिओमध्ये
एका तरुणीला दोन मुली लाथा-बुक्क्यांनी मारत आणि काही वेळा तुडवत असताना दिसत आहेत. तू माझ्या प्रियकरासोबत प्रेमसंबंध कशी ठेवतेस म्हणून दुसरी मुलगी तिला प्रश्न विचारत मारत आहे. सोबत तिची मैत्रीणदेखील
तिला मारायला मदत करताना दिसत आहे. दोघी मारणाऱ्या मुली मार खाणाऱ्या मुलीला अतिशय अर्वाच्य भाषेत शिवीगाळही करत आहेत.
विक्रोळी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार या तिन्ही मुली टागोर नगरमधील रहिवाशी असून तिघीही मैत्रिणी आहेत. तिन्ही मुलींची चौकशी सुरू आहे. या व्हिडिओमागील
सत्य चौकशीनंतर समोर येऊ शकते. मात्र, या मुलींची ही फ्री स्टाईल हाणामारी बघून सोशल मीडियावर टीकेची झोड उठली आहे.
व्हिडिओ 👇 पहा...
व्हिडिओ : सोशल मीडिया व्हायरल
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा