मुंबई, दादासाहेब येंधे : माहीमच्या समुद्रकिनारी रविवारी दर्ग्याच्या मागील भागात एक दहा फूट लांबीचा अजगर आढळून आला. अजगर दिसताच स्थानिक काही कोळी बांधवांनी मोठया धैर्याने त्याला पकडून एक गोणीत भरले आणि सर्पमित्रांशी संपर्क साधला. सततच्या पावसामुळे आणि भरतीमुळे अजगर भरकटत आला असावा, असा अंदाज वापरा या सर्पमित्रांच्या संस्थेने व्यक्त केला. गेल्या सात ते आठ महिन्यांपासून हा सातवा अजगर पकडल्याची माहिती सर्पमित्र अतुल कांबळी यांनी दिली. हा अजगर पकडून वनविभागाच्या ताब्यात दिला आहे.
व्हिडिओ
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा