मुंबई : आंतरराष्ट्रीय योग दिन सोमवारी मुंबईसह देशभर साजरा झाला. कोरोनाचे निर्बंध काही प्रमाणात शिथिल झाल्यामुळे बऱ्याच ठिकाणी सामूहिक योग शिबिरे पार पडली. तर कोरोनाच्या निर्बंधांमुळे फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकल मध्ये प्रवेश आहे. त्यामुळे मोकळ्या धावत असलेल्या लोकलमध्ये योग करण्याची संधी प्रवाशांना मिळाली. अनेक लोकल गाड्यांमध्ये प्रवाशांनी योगासने केली.
0 टिप्पण्या