स्टँडअप इंडिया योजनेंतर्गत सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी प्रस्ताव सादर करावेत - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

मंगळवार, २२ जून, २०२१

स्टँडअप इंडिया योजनेंतर्गत सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी प्रस्ताव सादर करावेत

मुंबई : स्टँडअप इंडिया योजनेंतर्गत सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी मुंबई शहर जिल्ह्यामधील अनुसुचित जाती व नवबौद्ध घटकातील नवउद्योजक यांनी परिपूर्ण प्रस्ताव सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर कार्यालय, प्रशासकीय इमारत, भाग-1, चौथा मजला, आ.सी.मार्ग, चेंबूर, मुंबई-400071 कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावेत,असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर यांनी केले आहे.

राज्यातील अनुसुचित जाती व नवबौद्ध घटकातील सवलतीस पात्र नवउद्योजक यांना फ्रंट एंड सबसिडी बँकेने स्टँडअप इंडिया योजनेअंतर्गत 75 टक्के कर्ज मंजुर केल्यानंतर व अनुसुचित जाती व नवबौद्ध घटकातील सवलतीस पात्र नवउद्योजकाने 10 टक्के रक्कम स्वहिस्सा भरणा केल्यानंतर 15 टक्के मार्जिन मनी अनुदान रक्कम राज्य शासनामार्फत देण्यात येते.

केंद्र शासनने स्टँडअप इंडिया योजनेअंतर्गत राष्ट्रीयकृत बँकांनी मंजुर केलेल्या प्रकरणांमध्ये अनुसुचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकांतील पात्र नवउद्योजक लाभार्थ्यांकरीता मार्जिन मनी उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय 8.3.2019, 9.12.202026.3.2021 अन्वये या योजनेच्या अटी व शर्ती तसेच लाभार्थ्यांनी प्रस्तावासोबत सादर करावयाचे कागदपत्रांची सुची निर्गमित केलेली आहे. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेले असून त्यांचे सांकेतिक क्रमांक 201903081643216222, 202012101531252722202103261633277622 असे आहेत.

मुंबई शहर जिल्ह्यामधील अनुसुचित जाती व नवबौद्ध घटकातील नवउद्योजक यांनी परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत, असे पत्रक सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर यांनी  प्रसिद्धीस दिले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज