Ticker

6/recent/ticker-posts

पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून मान्यता द्यावी- मुंबई मराठी पत्रकार संघ

पत्रकार आणि पत्रकारेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत निवेदन

मुंबई, दादासाहेब येंधे : कोरोना महामारीच्या काळात पत्रकारांना महाराष्ट्र शासनाने अक्षरशः वाऱ्यावर सोडले आहे. यापूर्वी संघाने आपल्याशी यासंदर्भात वेळोवेळी पत्रव्यवहार केला आहे. आपल्याला व्हॉटस्‌अप मेसेज देखील पाठविले आहेत. पण त्याचा काही उपयोग झालेला नाही. दरम्यान, पत्रकारांच्या मागण्यांबाबत आपण सकारात्मक असल्याचा आपला निरोप आपले जनसंपर्क अधिकारी श्री. अनिरुद्ध अष्टपुत्रे यांनी वेळोवेळी आम्हाला दिला आहे. आपल्याच विनंतीवरून आम्ही एप्रिल २०२१ च्या अखेरच्या आठवड्यात पुकारलेले पत्रकारांचे आंदोलन स्थगित केले. पण आता मे महिना संपत आला तरी पत्रकारांना शासनाकडून कोणताही दिलासा मिळताना दिसत नाही.

या पार्श्वभूमीवर मुंबई मराठी पत्रकार संघाने नुकतीच विविध पत्रकार संघटनांची बैठक दूरदृष्य प्रणालीद्वारेआयोजित केली होती. या बैठकीत पत्रकारांच्या सद्यस्थितीबाबत तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली. तसेच दुसऱ्या बैठकीत प्रामुख्याने तीन मागण्या शासनाकडे कराव्यात, असे ठरविण्यात आले. त्या मागण्या अशा:

१) पत्रकारांना रेल्वे प्रवासाची मुभा द्यावी.

२) पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांसाठी प्राधान्याने लसीकरणाची सोय उपलब्ध करावी.

३) पत्रकारांना फ्रेंटलाइन वर्कर म्हणून मान्यता द्यावी.

आमच्या या वरील मागण्या आपण येत्या बुधवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठळीत तातडीने मंजूर कराव्यात, अशी मागणी केली आहे. बुधवार, दि. २६ मे, २०२१ पर्यंत या मागण्या मान्य न झाल्यास पत्रकारांना नाईलाजाने आंदोलन पुकारून न्यायालयात दाद मागावी लागेल अशी माहिती मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र विश्वनाथराव वाबळे तसेच कार्यवाह विष्णू सोनवणे यांनी दिली आहे. 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या