जास्तीत जास्त नागरिकांना कोव्हीड १९ लसीकरण व्हावे याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कोव्हीड लसीकरण केंद्रांमध्ये सातत्याने वाढ करण्यात येत असून आजपासून महानगरपालिकेच्या सीबीडी, करावे, कुकशेत, शिरवणे, जुहूगांव, घणसोली, ऐरोली, दिघा, पावणे, राबाडे, कातकरीपाडा व इलठणपाडा अशा १२ प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरण सुरू करण्यात आलेले आहे.
वाशी, नेरूळ व ऐरोली येथील ३ सार्वजनिक रूग्णालयांत अहोरात्र २४ तास लसीकरणाची सुविधा ११ मार्चपासून उपलब्ध करून देण्याचा महत्वपूर्ण निर्णय महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी घेतलेला आहे.
या अनुषंगाने आयुक्तांनी आज नवी मुंबई महानगरपालिकेच्या ऐरोली, सेक्टर 3 येथील राजमाता जिजाऊ रूग्णालय तसेच चिंचपाडा प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र येथील लसीकरण केंद्राला भेट देत त्याठिकाणी होत असलेल्या लसीकरण कार्यवाहीची पाहणी केली. तसेच ऐरोली रूग्णालयातील आयसीयू वॉर्ड आणि महिला व पुरूषांचे मेडिकल वॉर्ड्स याठिकाणी भेट देऊन कार्यवाहीची पाहणी केली.
यावेळी आयुक्तांनी लस घेऊन निरीक्षण कक्षात थांबलेल्या ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधत त्यांची विचारपूस केली. महानगरपालिकेच्या केंद्रात मोफत लसीकरण सुरू झाल्याची माहिती आपल्या परिचयातील ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना तसेच ४५ वर्षावरील कोमॉर्बिड व्यक्तींना द्यावी असे आयुक्तांनी यावेळी निरीक्षण कक्षातील ज्येष्ठ नागरिकांना आवाहन केले. त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या वतीने सोशल मिडियावरून लसीकरण केंद्रांची यादी व्यापक स्वरूपात प्रसिध्द करावी अशा सूचना केल्या. प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांच्या अंतर्गत क्षेत्रात तेथील आशा वर्कर यांच्यामार्फतही नागरिकांपर्यंत माहिती पोहोचवावी असे वैद्यकीय अधिकारी यांना सूचित करण्यात आले.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ९ मार्चपर्यंत ३५५६१ लाभार्थींना लसीकरण करण्यात आले असून सद्यस्थितीत ३० लसीकरण केंद्रांवर लसीकरण होत आहे. यामध्ये १९ महानगरपालिका रूग्णालये व आरोग्य केंद्रे यांचा समावेश आहे. - (1) सार्वजनिक रूग्णालय वाशी,
(2) माँसाहेब मिनाताई ठाकरे रूग्णालय नेरूळ,
(3) राजमाता जिजाऊ रूग्णालय ऐरोली,
(4) प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र - इंदिरानगर,
(5) प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र - चिंचपाडा,
(6) प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र - खैरणे,
(7) प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र - वाशीगांव सेक्टर 2 वाशी,
(8) प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र - सीबीडी बेलापूर,
(9) प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र - करावे,
(10) प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र - कुकशेत सेक्टर 16 नेरूळ,
(11) प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र - शिरवणेगांव,
(12) प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र - पावणेगांव,
(13) प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र - जुहूगांव,
(14) प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र - सेक्टर 4 घणसोली,
(15) प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र - राबाडागांव,
(16) प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र - कातकरीपाडा राबाडे,
(17) प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र - सेक्टर 2 ऐरोली,
(18) प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र - दिघागांव,
(19) प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र - इलठणपाडा
- या नवी मुंबई महानगरपालिकेच्या १९ रूग्णालय / नागरी आरोग्य केंद्रांमध्ये विनामूल्य लसीकरण होत आहे.
याशिवाय ११ खाजगी रूग्णालयांमध्येही लसीकरण होत असून त्यामध्ये -
(1) डिव्हाईन हॉस्पिटल, घणसोली,
(2) महात्मा फुले चॅरिटेबल ट्रस्ट (MPCT) हॉस्पिटल, सानपाडा,
(3) आर.एन.पाटील सुरज हॉस्पिटल, सानपाडा,
(4) आचार्य श्री नानेश हॉस्पिटल, सी.बी.डी. बेलापूर,
(5) मंगलप्रभु हॉस्पिटल, जुईनगर,
(6) डि.वाय.पाटील हॉस्पिटल नेरुळ,
(7) सुयश हॉस्पिटल नेरुळ,
(8) सुश्रुषा हॉस्पिटल नेरुळ,
(9) इंद्रावती हॉस्पिटल से-3 ऐरोली,
(10) सनशाईन हास्पिटल नेरुळ,
(11) तेरणा हॉस्पिटल नेरुळ - अशा ११ खाजगी रुग्णालयांचा समावेश आहे.
अशा प्रकारे आजमितीस १९ महानगरपालिका व ११ खाजगी अशा ३० लसीकरण केंद्रांवर लस दिली जात असून १२ मार्च पासून माता बाल रुग्णालय तुर्भे आणि प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र तुर्भे या २ ठिकाणीही लसीकरण केंद्र कार्यान्वित केली जाणार आहेत.
सध्या पहिल्या टप्प्यात डॉक्टरांसह इतर आरोग्यकर्मी तसेच दुसऱ्या टप्प्यात पोलीस सुरक्षा स्वच्छता व इतर पहिल्या फळीतील कोरोना योध्दे त्याचप्रमाणे तिस-या टप्प्यात ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्षावरील कोमॉर्बिड व्यक्तींना लसीकरण केले जात आहे. महानगरपालिकेच्या १९ लसीकरण केंद्रांवर ही लस मोफत दिली जात असून सर्व लाभार्थी नागरिकांनी अत्यंत सुरक्षित असलेल्या या लसीकरणाचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा