Ticker

कल्पतरू समूहाच्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

२९ वर्षे रक्तदान शिबिरात सातत्य राखून समाजसेवेचा वारसा... हे फक्त कल्पतरू समूहच करू शकते - आमदार यामिनीताई जाधव

मुंबई, दादासाहेब येंधे : चिंचपोकळी (पू) येथील कल्पतरू समूहातर्फे नुकत्याच पार पडलेल्या २९ व्या रक्तदान शिबिरात ७० रक्तदात्यांनी रक्तदान करून भरघोस प्रातिसाद दिला. या कार्यक्रमास वार्प इंजिनियरींग या कंपनीचे डायरेक्टर श्री. प्रभूदास गोला यांनी उपस्थिती लावून मंडळाची शिस्त व रक्तदान शिबिराचे सातत्य याविषयी तोंडभरून कौतुक केले. २९ वर्षे रक्तदान शिबिर राबवून सातत्य राखल्याबद्दल समूहाला संबोधताना शिवसेना आमदार सौ. यामिनीताई जाधव यांनी मंडळाला शुभेच्छा दिल्या.  तसेच रंगारी बदक चाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री. भाई मयेकर यांनी मंडळाला संबोधताना म्हटले की या विभागातील इतर सर्व मंडळे कल्पतरू समूहाच्या समाजसेवेचा आदर्श घेत आहेत, ही मोठी कौतुकाची गोष्ट आहे. सदर रक्तदान शिबिरास स्थानिक शिवसेना नगरसेवक श्री. रमाकांत रहाटे, नायर रुग्णालयाचे समाजविकास अधिकारी श्री. पवार तसेच महावीर इंटरनॅशनल, मुंबई चे अध्यक्ष श्री. पारसमल गोलेचा यांनी हजेरी लावली.  सदर रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी विठ्ठल पै, शेखर साळसकर, शिवाजी पाटील, सुजित, महेश नानचे, स्वप्नील, सुनिकेत, शुभम स्वार, समृद्धी येंधे, समीक्षा, तन्वी येंधे, अमेय परब, श्री. बाळा परब, आनंदा पाटील, संजीव केरकर, चारुदत्त लाड, श्री. शिवणेकर, संतोष रायकर, आदित्य देसाई, विनायक येंधे, शिरीष ताम्हणकर, समीर नाईक आदी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

व्हिडिओ पाहा...👇





स्थानिक शिवसेना आमदार सौ. यामिनीताई जाधव यांनी रक्तदान शिबिरास सदिच्छा भेट दिली.



स्थानिक शिवसेना नगरसेवक श्री. रमाकांत रहाटे यांच्याहस्ते नायर रुग्णालयाचे समाजविकास अधिकारी डॉ. पवार यांचा सत्कार 


 वार्प इंजिनियरींग या कंपनीचे डायरेक्टर श्री. प्रभूदास गोला यांनी शिबिरास सदिच्छा भेट दिली.




महावीर इंटरनॅशनल, मुंबई चे अध्यक्ष श्री. पारसमल गोलेचा यांच्यहस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र वाटप.







टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या