Ticker

6/recent/ticker-posts

कल्याणच्या इराणी वस्तीत जमावाकडून पोलिसांवर हल्ला

हल्ल्यात तीन पोलीस जखमी...

कल्याण - कसारा रेल्वे मार्गावरील आंबिवली रेल्वे स्थानकाशेजारी इराणी टोळीची वस्ती  (कबेलाअसून या वस्तीतअनेक गुन्हेगार आश्रय घेत असल्याचे अनेकदा पोलिसांच्या छापेमारीत उघड झाले आहेविशेष म्हणजे  इराणी 
वस्ती पोलिसांवर यापूर्वी  ते  वेळा हल्ले झाले असून पोलिसांवर इराणी जमावाने आज हल्ला करून  पुन्हा एकदागुन्हेगारांची इराणी वस्ती चर्चमध्ये आली आहेतर हल्ल्यात  जखमी पोलीस पथक एका सराईत आरोपीला 
पकडण्यासाठी गेले असता,  पोलिसांवर इराण्यांनी तुफान दगडफेक करत त्या सराईत  आरोपीची सुटका केल्याचाखळबळजनक प्रकार समोर आला आहे.
 
रेल्वे फाटक बंद असल्याने थांबली पोलीस व्हॅन आणि त्यांनतर .... 
कल्याण ते कसारा रेल्वे मार्गावर आंबविलीच्या इराणी वस्तीत एक सराईत गुन्हेगार पडकण्यासाठी मीरा भाईंदर  पोलिसांचे पथक आले होतेपथकाने संबंधित आरोपीला इराणी वस्तीतून ताब्यात घेऊन पोलीस व्हॅनमध्ये बसवून नेत होतेनेमक्या त्याच वेळेला आंबिवली रेल्वे स्थानकानजीक असलेले रेल्वेचे  फाटक बंद असल्याने पोलिसांच्या दोन्ही व्हॅन तिकडे अडकूनपडल्याआणि हीच संधी साधत इराणी वस्तीतील महिला आणि तरुणांनी पोलिसांच्या गाड्यांवर तुफान दगडफेक सुरू केलीतर काही जणांनी बांबूच्या सहाय्याने गाड्यांवर हल्ला चढवलाअचानक झालेल्या या हल्ल्याने काही काळ पोलिसही बिथरून गेले  तर दोन गाड्यांपैकी एक व्हॅन  कशीबशी तिथून दुसऱ्या मार्गाने निघून गेलीत्यामुळे नेमकं ज्या पोलीस व्हॅनमध्ये या आरोपीला ठेवण्यात आले होते.  तीच या हल्लेखोर इराणी जमावाच्या   तावडीत सापडलीज्यातून या इराण्यांनी त्या सराईत आरोपीची  पोलिसांच्या तावडीतून खेचून बाहेर काढले आणि तिथून धूम ठोकलीजमावाच्या हल्ल्यात मीरा भाईंदर क्राईम ब्रांचेच्या पथकातील तीन पोलीस जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेतर कल्याण च्या खडपाडा पोलीस ठाण्यात हल्लेखोर इराणी जमावावर गुन्हा   दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांचा शोध सुरु केला  आहे.
 
यापूर्वीही  ते  वेळा पोलिसांवर हल्ले. .. 
कल्याणच्या आंबविलीजवळील इराणी वस्ती आणि तिथली गुन्हेगारी पार्श्वभूमी काही नविन नाहीयाआधीही या वस्तीतील जमावाने  पोलिसांवर हल्ल्याच्या अनेक घटना घडल्या आहेतत्यात आणखी एका घटनेची भर पडली असून इराणी वस्तीतील  ही दहशत पोलीस विभाग आणखी किती काळ सहन करणारया दहशतीला आणि थेट खाकी वर्दीवर हात टाकणाऱ्यांना सरकार आणखी किती पाठीशी घालणार हाच खरा प्रश्न पुन्हा आजच्या हल्ल्याने उपस्थित झाला आहे

 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या