दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील विकासकामांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
मुंबई : मुंबईतील दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील विविध विकासकामांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतला.
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीस उद्योगमंत्री सुभाष देसाई, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मुंबईचे उपमहापौर सुहास वाडकर, आमदार सुनिल प्रभू, मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, एमएमआरडीएचे आयुक्त आर. ए. राजीव, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव गौतम चटर्जी, झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे, मुंबई महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त पी. वेलारासू यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
बैठकीत दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील विविध रस्त्यांची कामे व रुंदीकरण, पोयसर नदी पात्र विकासातील बाधितांचे पुनवर्सन आणि कुरार नाला विकासातील बाधितांचे पुनवर्सन यांसह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा