ज्येष्ठ अभिनेते, निर्माते राजीव कपूर कालवश
मुंबई : प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक राज कपूर यांचे चिरंजीव आणि अभिनेते राजीव कपूर यांचे मंगळवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ५८ वर्षांचे होते. मागच्याच वर्षी ३० एप्रिल रोजी त्यांचे बंधू ऋषी कपूर यांचे निधन झाले होते. हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध कपूर कुटुंबात जन्मलेल्या राजीव यांनी अभिनयाखेरीज निर्माता आणि दिग्दर्शक म्हणूनही काम केले.
'राम तेरी गंगा मैली', आसमान, जबरदस्त आणि जबरदस्त, हम तो चले परदेस अशा काही चित्रपटांत त्यांचा अभिनय पाहायला मिळाला. अभिनयाखेरीज निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून त्यांनी काम केले. 'हीना' या चित्रपटाचे ते निर्माते होते. माधुरी दिक्षितची प्रमुख भूमिका असलेला 'प्रेम ग्रंथ' या चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यांनी केले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा