Ticker

6/recent/ticker-posts

मानखुर्द येथे गोदामाला आग

 मुंबई : मानखुर्द मंडाळा येथील कुर्ला भंगार गोदामास शुक्रवारी दुपारी २.४५ च्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत अनेक भंगार दुकाने अक्षरशः भस्मसात झाली. या आगीत रसायने आणि तेलाचे सुमारे ६०० डबे फुटून ही आग वनव्यासारखी पसरत गेली. त्यात, २० गोदामे जळून खाक झाल्याचे सांगण्यात येते. मात्र, या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. अग्निशामक दलाच्या जवानांनी शर्थीच्या प्रयत्नांनी ही आग ९.२० च्या सुमारास आटोक्यात आणली. सदर रस्त्यावर वाहतूककोंडी होऊ नये म्हणून बेस्ट उपक्रमाने बस वाहतूक अन्य मार्गावर वळवली होती.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या