ओबीसी, सामान्य प्रवर्ग, अतिदुर्बल घटक आणि ‘ऊसतोड कामगारां’च्या पाल्यांच्या शिक्षणासाठी विशेष धोरण तयार करावे - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

गुरुवार, ११ फेब्रुवारी, २०२१

ओबीसी, सामान्य प्रवर्ग, अतिदुर्बल घटक आणि ‘ऊसतोड कामगारां’च्या पाल्यांच्या शिक्षणासाठी विशेष धोरण तयार करावे

बालगृहांचे प्रलंबित अनुदान तातडीने अदा करण्याचे निर्देश - महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर
     
      मुंबई : इतर मागास वर्गसामान्य प्रवर्गातील गरजूअति-दुर्बल घटक आणि ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षण मिळावे याकरिता विशेष धोरण आखण्यासाठीची कार्यवाही जलद गतीने करावी, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी दिले.
            मंत्रालयात राज्यातील स्वयंसेवी संस्थेमार्फत मान्यताप्राप्त बालगृहांचे वसतीगृहांमध्ये रूपांतर करणेकर्मचाऱ्यांना शिक्षणसेवकाप्रमाणे मानधन लागू करणे व मुल्यांकनांच्या ७५ टक्के इमारत भाडे लागू करणे, बालगृहाचे 2011 ते 17 पर्यंतचे प्रलंबित अनुदान मिळणेबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले.  बैठकीस पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडेमहिला व बालविकास विभागाच्या सचिव आय.ए.कुंदनआयुक्त ऋषीकेश यशोदमहिला व बालविकास स्वयंसेवी संघटनेचे अध्यक्ष रामदास चव्हाण उपस्थित होते.
            महिला व बालविकास मंत्री ॲड.ठाकूर म्हणाल्याअनाथ  मुलांचा सांभाळ करणे ही जबाबदारी आहे आणि या मुलांना सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांना मानसिकरित्या सुदृढ ठेवणे हे कर्तव्य आहे. बालकल्याण समितीच्या निर्देशानुसार ज्या संस्था अधिकृतरित्या कार्यरत आहेत. अशा उर्वरित सहा जिल्ह्यातील संस्थेचे २०१५-१६ आणि २०१६-१७ मधील प्रलंबित अनुदान दहा कोटी असूनयातील जास्तीत जास्त रक्कम या संस्थांना देण्यात यावी. जेणेकरून त्यांना बालगृहातील बालकांना अखंडपणे सुविधा पुरविता येतील. या बालकांचा सांभाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ व्हावी यासाठी तातडीने एक महिन्याच्या आत अभ्यास समिती स्थापन करावी, असे निर्देशही ॲड.ठाकूर यांनी दिले.
            ॲड.ठाकूर म्हणाल्यामागासवर्गीय विद्यार्थ्यांप्रमाणे इतर मागासवर्गसामान्य प्रवर्गअति दुर्बल घटक आणि ऊसतोड कर्मचाऱ्यांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी तरतूद करणे गरजेचे असूनयासाठी विशेष धोरण तयार करण्यात यावे, असे निर्देशही श्रीमती यशोमती ठाकूर यांनी दिले.        
            यावेळी महिला व बालविकास विभाग उपायुक्त श्री.मुंढेमहाराष्ट्र महिला केंद्रबालसदन, बालाकाश्रम मुलींचे वसतीगृहबालगृह स्वयंसेवी संस्थाचालक संघाचे प्रदेश अध्यक्ष रामदास चव्हाणकार्याध्यक्ष शिवाजी जोशीप्रदेश सरचिटणीस बालाजी मुस्कावाड, आर.के.जाधवधोंडिराम पवार व  संबंधित विभागाचे अधिकारी आणि संघटनेचे पदाधिकारी बैठकीस उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज