मुंबई : मुंबई महापालिकेने कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे बंद केलेल्या भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानाचे (राणीबाग) दरवाजे सोमवारी खुले केले. मुंबईसह उपनगरांतील पर्यटकांनी मोठया प्रमाणात गर्दी केली होती. त्यात मुलांसह मोठ्यांचाही आनंद गगनात मावत नव्हता. गेले वर्षभर इथलं उद्यान, प्राणिसंग्रहालय सुनेसुने होते. ते निर्बंध सोमवारी उठवण्यात आल्यावर पर्यटकांची गर्दी उसळली होती.



0 टिप्पण्या