मदत करण्याच्या बहाण्याने फसवणूक करणारे दोन आरोपी अटक - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०२१

मदत करण्याच्या बहाण्याने फसवणूक करणारे दोन आरोपी अटक

ए. टी. एम सेंटर किंवा बँकेमध्ये वयोवृद्धाना पैसे जमा करण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने फसवणूक करणारे दोन आरोपी अटक 


०४ फेब्रुवारी २०२१ रोजी दुपारी १२.४५ वाजताच्या सुमारास फिर्यादी हे जुहू रोड वरील स्टेट बँक ऑफ इंडिया च्या एटीएम सेंटर मध्ये २०,०००/-रुपये जमा करण्यासाठी आले होते. त्यावेळी दोन अनोळखी इसमानी फिर्यादी यांना पैसे जमा करण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने हातचलाखी करून संगनमताने पैसे जमा न करता फसवणूक केली होती.

फिर्यादी यांनी दिनांक ०४/०२/२०२१ रोजी पोलीस ठाण्यास दिलेल्या तकारीवरून त्यांचा सविस्तर जबाब नोंद करून सांताक्रूझ पोलीस ठाणे गु.र. न ४१/२१ कलम ४२०, ३४ भा द वी नोंद करण्यात आला.

सदर गुन्हा दाखल झाले नंतर तात्काळ पोउनी शिवाजी शिंदे व गुन्हे प्रकटीकरण पथक यांनी वेळोवेळी घटनास्थळाची पाहणी करून नमूद ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे चेक करून सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपीबाबत माहिती प्राप्त करीत असताना दोन्ही आरोपी हे त्या ठिकाणी रिक्षाने आले असल्याचे निदर्शनास  आले. त्याप्रमाणे नमूद रिक्षाचा क्रमांक प्राप्त केला असता ती तुर्भे, नवी मुंबई येथील असल्याचे समजले. परंतु नमूद रिक्षाचा नोंदणी कृत पत्ता हा तुर्भे स्टोर परिसरात झोपडपट्टी भागात असल्याने माहिती प्राप्त होत नव्हती. अखेर नमूद पथकाने गुप्तपणे रिक्षा चालकाबाबत माहिती प्राप्त करून त्याचा मोबाईल क्रमांक प्राप्त केला व "पो शि/हंचनाळे.( परिमंडळ-९ कार्यालय)" यांच्या मदतीने वेळोवेळी त्याचे लोकेशन प्राप्त करून त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत तो नमूद इसमाना ओळखत नसून त्यांनी मुंबईतील भाड्यासाठी त्याला यापूर्वी २ ते ३ वेळा शिरवने गाव, नेरुळ येथून नेल्याचे सांगितले.

त्यानुसार नमूद पथकाने दिनांक ०७/०२/२०२१ रोजी दिवस रात्र शिरवणे गाव परिसरात सापळा रचून रिक्षाचालकाच्या मदतीने आरोपींची ओळख पटवून त्यांना शिताफीने ताब्यात घेतले व पोलीस ठाण्यास आणून चौकशी अंती त्यांना गु.र.क्र.४१/२०२१, कलम ४२०, ३४ भा.द.वि. मध्ये अटक करण्यात आली आहे.
         
नमूद दोन्ही आरोपींना आज रोजी पोलीस कोठडी रिमांड रिपोर्ट सह मा.७१ वे न्यायालायत हजर केले असता मा. न्यायालयाने त्यांची दिनांक १५/०२/२०२१ रोजी पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यातील फसवणूक केलेली रक्कम हस्तगत करण्यात येत आहे.

अटक आरोपी

१) आसिफ अब्दुल वाहिद शेख, वय, वय २५ वर्ष, रा.ठी. गणेश नगर, तुर्भे नाका, नवी मुंबई.

२) राजेश दामोदर बेहरा , वय ३५ वर्ष, दोघेही रा.ठी. सद्गुरू कृपा बिल्डिंग, शिरवणे गाव, नेरुळ, नवी मुंबई.

अटक दिनांक:
०९/०२/२०२१ रोजी ०२.२३ वा.

नमूद आरोपी यांनी मुंबई हद्दीत इतर ठिकाणी अशाप्रकारे गुन्हे केले असल्याची शक्यता आहे.

        सदर गुन्ह्याचा तपास मा. पोलीस उपायुक्त श्री. अभिषेक त्रिमुखे, परिमंडळ -९, मा. सपोआ. राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनपर सूचनांनुसार व वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली पोनि. पाटील ( गुन्हे), पोलीस  उपनिरीक्षक शिवाजी शिंदे, पोहवा/ पाटील, पोशि/ परब, पोशि /शिरसाठ, पोशि/महाजन यांनी केला आहे. अशी माहिती सांताक्रूझ पोलीस ठाणेचे  वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे यांनी दिली आहे. 







       

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज