काँग्रेसतर्फे सोशल मीडिया कॅम्पेनची मुंबईत दणक्यात सुरुवात........ - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०२१

काँग्रेसतर्फे सोशल मीडिया कॅम्पेनची मुंबईत दणक्यात सुरुवात........

सोशल मीडिया ही जीवनातील एक अविभाज्य घटक बनला असून, सोशल मीडिया कॅम्पेनच्या माध्यमातून एका महिन्यात काँग्रेस संपूर्ण भारतात पहिल्या टप्प्यात ५ लाख सभासद (सोशल मीडिया वॉरियर्स) करणार - भाई जगताप... 

सोशल मीडिया ही काळाची गरज आहे. सोशल मीडिया हा असा एक मंच आहे, जिथे दररोज आंदोलने होत असतात, चर्चा होत असतात, लोक आपले विषय आणि प्रतिक्रिया ठामपणे मांडत असतात. सध्याच्या काळात सोशल मीडिया हा जीवनातील अविभाज्य घटक बनला आहे. हीच काळाची गरज लक्षात घेऊन काँग्रेसतर्फे आज सोशल मीडिया कॅम्पेन सुरु करण्यात आले असून, एका महिन्यात संपूर्ण भारतभर पहिल्या टप्प्यात ५ लाख सभासद (सोशल मीडिया वॉरियर्स) करण्याचा आमचा मानस आहे, अशी घोषणा आज मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी आज मुंबईतील पत्रकार परिषदेमध्ये केली. मुंबईत आज मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या अध्यक्षतेखाली ऑल इंडिया काँग्रेस कमिटी (AICC) सोशल मीडिया डिपार्टमेंट आणि मुंबई काँग्रेसच्या सोशल मीडिया डिपार्टमेंटतर्फे काँग्रेसच्या सोशल मीडिया कॅम्पेनचे उदघाटन भाई जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. या उदघाटन प्रसंगी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, AICC सोशल मीडिया नॅशनल कोऑर्डिनेटर गौरव पांधी, मुंबई काँग्रेस सोशल मीडिया डिपार्टमेंटचे अध्यक्ष आशिष जोशी, राजेश चतवाल, National Executive Member, Social Media आणि मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस भूषण पाटील व संदेश कोंडविलकर उपस्थित होते. 

भाई जगताप पुढे म्हणाले की, काँग्रेस सोशल मीडियावर कार्यरत नाही असा जनतेमध्ये संभ्रम पसरविला जात आहे, तो अतिशय चुकीचा आहे. कोविड महामारीच्या काळात सोशल मीडियावर सर्वात जास्त कार्यरत काँगेस होते. या सोशल मीडिया कॅम्पेनच्या माध्यमाने काँग्रेस अधिक व्यापक रीतीने सोशल मीडियावर कार्यरत होणार आहे. सोशल मीडिया कॅम्पेनच्या माध्यमातून एका महिन्यात काँग्रेस संपूर्ण भारतात ५ लाख सभासद (सोशल मीडिया वॉरियर्स) करणार आहोत. यातील ५०,००० सभासद यांना निरनिराळी पदे देऊन विशिष्ट आणि महत्वाची जबाबदारी देण्यात येणार आहे. संपूर्ण भारतात सोशल मीडिया कॅम्पेन राबविण्याची संकल्पना हि आमचे नेते श्री राहुल गांधी यांची आहे. त्यांनी यासाठी पुढाकार घेतलेला  आहे.    

AICC सोशल मीडिया नॅशनल कोऑर्डिनेटर गौरव पांधी म्हणाले कि सोशल मीडिया कॅम्पेनद्वारे जास्तीत जास्त सभासद तयार करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. पहिल्या टप्प्यात ५ लाख सभासद करणार आहोत. हे कॅम्पेन आम्ही दिल्लीत दोन दिवसापूर्वी दिल्लीतून सुरु केले, आज मुंबईतुन सुरु करत आहोत आणि लवकरच प्रत्येक शहरात सुरु करणार आहोत. सोशल मीडिया कॅम्पेनमध्ये सभासद होण्यासाठी तुम्ही मिस कॉल करू शकता, व्हाट्सअप करू शकता, ईमेल करू शकता, वेबसाईटवर संपर्क साधू शकता. मिस्ड कॉल - १८०० १२०० ०००४४, व्हाट्सअप नंबर - ७५७४० ००५२५, ई मेल - smw@inc.in
वेबसाईट - www.incsmw.in किंवा www.incsmwarriors.com येथे संपर्क साधू शकता. 







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज