मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षा कधी होणार, याबाबत गेले काही दिवस चर्चा सुरू होत्या. या परीक्षा यंदाच्या वर्षी एप्रिल-मेमध्ये नियोजित करण्यात आल्या आहेत. बारावीच्या परीक्षा २३ एप्रिल ते २९ मे या कालावधीत, तर दहावीच्या परीक्षा २९ एप्रिल ते ३१ मे या कालावधीत घेण्यात येणार आहेत.
0 टिप्पण्या