बँकांची फसवणूक करणारी टोळी गजाआड
नवी मुंबई : सहा कोटी रुपयांची बनावट किसान विकास पत्र आणि राष्ट्रीय बचत पत्र तयार करून पतसंस्था आणि बँकांमध्ये ही पत्रे गहाण ठेऊन कर्ज घेऊन फसवणूक करणाऱ्या टोळीला पनवेल पोलिसांनी नुकतेच जेरबंद केले. याप्रकरणी चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून यातील मुख्य आरोपी बाबाराव चव्हाण हा पूर्वी नांदेड येथे डाक विभागात पोस्ट मास्तर पदावर नोकरीस होता. तेथे हेराफेरी केल्याने त्याला निलंबित करण्यात आले आहे.
गुप्तहेराकडून मिळालेल्या माहितीनुसार बनावट किसान पत्र व राष्ट्रीय बचत पत्र भासवून बँकेत गहाण ठेऊन कर्ज घेणाऱ्या टोळीतील काही व्यक्ती पनवेल येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे व पोलीस निरीक्षक (गुन्हे) संजय जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने एचडीएफसी बँक पनवेल येथे सापळा रचून २० जानेवारीला दोन संशयितांना ताब्यात घेतले. या संशयितांची कसून चौकशी केली असता त्यांच्याकडून २ बनावट किसान विकास पत्र व ७ बनावट राष्ट्रीय बचत पत्र हस्तगत करण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा