एकाच व्यासपीठावर दिगग्ज राजकारणी;
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मानले आभार
मुंबई, दादासाहेब येंधे : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नऊ फूट उंच पुतळ्याचा लोकार्पण सोहळा कुलाबा येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात काल शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडला. तर कोनशिलेचे उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री जयंत पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, छगन भुजबळ, निलमताई गोऱ्हे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासह पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते.
व्हायरल व्हिडिओ
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा