Ticker

6/recent/ticker-posts

अभिनेत्री श्वेता कुमारी न्यायालयीन कोठडीत

मुंबई : अमली पदार्थ प्रकरणात अटक केलेल्या दक्षिण भारतीय अभिनेत्री श्वेता कुमारी हिला विशेष एनसीबी न्यायालयाने गुरुवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. तिच्या जामीन अर्जावर आज शुक्रवारी सुनावणी होणार आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने जानेवारी रोजी एका छाप्यात ४०० ग्रॅम एमडी हस्तगत केले. त्याविषयी चौकशी अंती मीरा-भाईंदर मधील एका हॉटेलवर अधिकाऱ्यांनी छापा मारला त्यावेळी तिला अटक करण्यात आली होती.

दरम्यान बुधवारी अटक केलेल्या ड्रग्ज विक्रेता स्वामी नारायण यालाही चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली अशी माहिती विशेष सरकारी वकील अतुल सरपांडे यांनी दिली.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या