मुंबई : सुबोधकुमार जयस्वाल हे केंद्रीय सेवेत परतल्यामुळे राज्याच्या पोलिस महासंचालक पदाची जबाबदारी हेमंत नगराळे यांच्याकडे गुरुवारी सोपविण्यात आली आहे. नगराळे यांच्याकडे तूर्तास महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार असला तरी या पदासाठी त्यांचेच नाव निश्चित असल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान जयस्वाल यांनी केंद्रिय सेवेत परतण्याची परवानगी राज्य सरकारकडे मागितली होती. राज्य सरकारने ती दिल्यानंतर केंद्र सरकारने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा
दलाच्या महासंचालकपदी त्यांची नियुक्ती केली. गुरुवारी
त्यांना कार्यमुक्त करण्यात आले आणि राज्याचे कायदे आणि तांत्रिक विभागाचे
महासंचालक हेमंत नगराळे यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला.
महाराष्ट्र
पोलिसांसमोर अनेक आव्हाने आहेत. पोलिसांनी रात्रंदिवस कष्ट करून कोरोनावर ज्या पद्धतीने मात केली, त्यावरून आपल्याला हे दिसून येते. पोलीस दलाचे कार्य यापुढेही असेच सुरू राहील आणि सरकारने माझ्यावर
दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्याचा मी प्रयत्न करेन.
असे हेमंत नगराळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मनोगत
व्यक्त करताना सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा