Ticker

6/recent/ticker-posts

लसीकरण टाळू नका

 महापौर किशोरी पेडणेकर यांचे नागरिकांना आवाहन

मुंबई, दादासाहेब येंधे :  कोरोनाला प्रतिबंध करणारे लसीकरण टाळण्यापेक्षा, लस घेऊन अधिक सुरक्षित व्हा. तसेच अधिकाधिक मुंबईकरांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी शुक्रवारी केले. लसीकरणाच्या रंगीत तालीम म्हणजे ( ड्राय रन) मोहिमेच्या शुभारंभाच्या वेळी त्या बोलत होत्या. वैद्यकीयदृष्ट्या लसीकरणाची पूर्ण प्रक्रिया अतिशय सजग व अभ्यासपूर्ण आहे. यासाठी पूर्ण दक्षता घेण्यात आली असल्याचेही महापौरांनी सांगितले. बीकेसी येथे जंबो कोविड केंद्रामध्ये राबवलेल्या या रंगीत तालीम मध्ये प्रत्यक्ष लसीकरण करताना कसा अनुभव असेल याची पूर्वतयारी करण्यात आली. महापालिकेच्या कूपर, राजावाडी रुग्णालयात येथील जंबो कोविड केंद्रांमध्ये आयोजित करण्यात आले होते. यासाठी २५ नोंदणीकृत आरोग्य कर्मचारी आभासी घेण्यासाठी येथे आले होते. त्यासाठी टोकन प्रक्रिया राबवण्याचे प्रात्यक्षिकही घेण्यात आले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या