लसीकरणाचा ड्राय रन यशस्वी - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

शनिवार, ९ जानेवारी, २०२१

लसीकरणाचा ड्राय रन यशस्वी

मुंबई :  महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये २३ जिल्हा रुग्णालये, ३० उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयें आणि ३२ प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच महानगरपालिकांमध्ये २९ शहरी आरोग्य केंद्रे मनपा रुग्णालय अशा एकूण ११४ ठिकाणी कोरोना लसीकरणासाठी रंगीत तालीम (ड्राय रन) यशस्वीरीत्या झाली, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

ज्यांना लसीकरण करण्यात येणार आहे अशा व्यक्तिंना लसीकरण झाल्याची खूण म्हणून मतदानानंतर ज्याप्रमाणे शाई लावली ाते, तशी शाई त्या व्यक्तीच्या बोटावर लावण्यात यावी, अशी विनंती केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाकडे करण्यात आली आहे. त्यांनी त्याला परवानगी दिली तर ठीक नाही तर राज्य शासन त्याची अंमलबजावणी करेल अशी माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली.

सध्या लसीकरणासाठी जे प्राधान्य गट ठरवून दिले आहेत त्यांच्या नंतर जेव्हा सामान्यांना लसीकरण केले जाईल त्यावेळेस गरीब आणि दारिद्र्यरेषेखालील व्यक्तींना केंद्र शासनाने मोफत लस द्यावी, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे करण्यात आल्याची माहिती टोपे यांनी दिली.

केंद्र शासनाकडून प्रत्यक्षात लसीकरणाची तारीख कळविल्यानंतर आणि लसीचा पुरवठा झाल्यानंतर राज्यात लसीकरण मोहीम कधी राबवायची याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री घेतील असेही आरोग्य मंत्र्यांनी सांगितले.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज