मुंबई, दादासाहेब येंधे : फोर्ट येथील सोमय्या इमारतीमधील 'किताब खान' या पुस्तकाच्या दुकानात सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीत हजारो पुस्तके जळून खाक झाली. आगीची माहिती मिळताच पालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने धाव घेत बचावकार्य सुरु केले.
मुंबई हाऊस जवळील सोमय्या ही चार मजल्यांची इमारत असून या ठिकाणच्या पुस्तकाच्या दुकानाला ५ वाजण्याच्या सुमारास आग लागली. हि आग लेव्हल-२ ची मुंबई अग्निशामक दलाकडून जाहीर करण्यात आले. दरम्यान, सायंकाळी ७.३० च्या सुमारास अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळविले.
0 टिप्पण्या