व्याघ्र विहार, सिंह विहार, नौकाविहार अजून प्रतीक्षाच..
मुंबई, दादासाहेब येंधे : बोरिवली येथील संजय गांधी उद्यान सध्या पर्यटकांसाठी अंशतः खुले करण्यात आले आहे. त्यामुळे ऐन हिवाळ्याच्या दिवसांमध्ये राष्ट्रीय उद्यानात निसर्गरम्य वातावरणात भटकण्याचा आनंद पर्यटकांना घेता येणार आहे. उद्यान पर्यटकांसाठी उघडण्यात आले असले तरी खासगी वाहनांना उद्यानात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे उद्यानातील प्रदूषणावर नियंत्रण येणार आहे. उद्यान सकाळी ८.३० ते ६.३० उघडे असेल. मात्र, वनराणी, व्याघ्र विहार, सिंह विहार, नौका विहार या गोष्टींसाठी पर्यटकांना अजून प्रतिक्षाच करावी लागणार आहे.


0 टिप्पण्या