Ticker

6/recent/ticker-posts

मुंबई ते पणजी एसटीची स्लीपर कोच धावणार

मुंबई, दादासाहेब येंधे : नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने मुंबई सेंट्रल ते पणजी अशी विनावातानुकूलित 'शययनयान कम आसनी' बससेवा ९ डिसेंबरपासून सुरु केली आहे. हि बस चिपळूण, कणकवली, सावंतवाडी, म्हापसामार्गे पणजी गाठणार आहे. 

अनलॉक सुरु झाल्याने राज्य सरकारने पर्यटनस्थळे सुरु केली आहेत. त्यात लांब पल्ल्यांच्या ट्रेन बंद सेवा तसेच विमान सेवेवर बंधने असल्याने नाताळ तसेच नवीन वर्ष स्वागतासाठी गोव्याला जाणाऱ्यांची संख्या पाहून एसटी महामंडळाने आपली  'शययनयान कम आसनी' बससेवा मुंबई सेंट्रल ते पणजी या मार्गावर सुरु केली आहे. या बसमध्ये १५ स्लीपर आणि ३० पुश बॅक सीटची सुविधा आहे. मुंबई सेंट्रल येथून हि बस ४.३० वाजता सुटणार आहे. या बसचे आगाऊ आरक्षण करण्यासाठी एसटी महामंडळाच्या msrtc.maharashtra.gov.in  या अधिकृत संकेतस्थळावर आरक्षण करता येणार आहे. 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या