कोविड वर येणाऱ्या लशींच्या साठवणुकीसाठी महापालिकेने जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यासाठी शहर, पश्चिम उपनगरे, पूर्व उपनगरे अशा तीन ठिकाणी कोल्ड स्टोरेज निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यापैकी पूर्व उपनगरातील कंजूरमार्ग येथील इमारतीची जागा निश्चित करण्यात आली आहे. ही पाच मजली इमारत पालिकेची असून तिथे लस साठविण्यासाठी आवश्यक ती रचना केली जाणार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त काकाणी यांनी दिली आहे.

0 टिप्पण्या