कोविड 19 च्या या महामारीत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोविड रुग्णांची त्याचप्रमाणे गरजूंची मदत करीत समाजसेवेची कास धरणाऱ्या कोविड योध्यांचा सन्मान जीवन प्रबोधिनी ट्रस्ट च्या वतीने करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने संस्थेचे हितचिंतक आणि मुंबईतील नामांकित डॉक्टर डॉ. आबासाहेब चव्हाण यांचा सन्मान संस्थेच्या वतीने करण्यात आला. कोविड रुग्णांना लागणारी वैद्यकीय सुविधा पुरविण्यासोबत आपल्या दैनंदिन कामकाजात व्यस्त असताना देखील संस्थेच्या माध्यमातून वेळी अवेळी करण्यात आलेल्या संपर्काला प्रतिसाद देऊन कोविड रुग्णांच्या वैद्यकीय उपचारासाठी तत्पर सेवा उपलब्ध करून संस्थेला सहकार्य केले त्याबद्दल त्यांना आभाररूपी सन्मान करीत गौरविण्यात आले.
त्यावेळी सदर संस्थेचे संस्थापक श्री. सत्यवान नर, अध्यक्ष श्री. अमित पवार, हेमंत मकवाना संस्थेचे पदाधिकारी बाजीराव तुपे, बाबू घोसाळकर, अविनाश पवार, सुशांत नाईक व सिध्देश पांगम उपस्थित होते.

0 टिप्पण्या