सिनेमागृह, नाट्यगृहे आजपासून खुली
मुंबई, दादासाहेब येंधे : कोरोनामुळे गेली सात महिन्यांपासून बंद असलेल्या मनोरंजन क्षेत्रासाठीही राज्य सरकारने बुधवारी महत्त्वाचा निर्णय घेतला असून आज, गुरुवारपासून टॉकीज, नाट्यगृहे, आणि मल्टिप्लेक्स
५० टक्के क्षमतेसह सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे.
मात्र, सिनेमगृहे,
नाट्यगृहे, मल्टिप्लेक्समध्ये खाण्याचे पदार्थ घेऊन जात येणार नाहीत. सांस्कृतिक कार्य विभागाने जी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत, ती या सेवेसाठी लागू असतील.
0 टिप्पण्या