मुंबई, दादासाहेब येंधे : आजच्या या कोरोना विषाणूच्या महामारीमध्ये संकटमय काळात महाराष्ट्र पोलीस अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी लॉकडाऊनच्या कठीण प्रसंगी स्वतःच्या जीवाची व कुटुंबियांची पर्वा न करता समाजहिताकरिता अहोरात्र मेहनत केली. त्याबद्दल साप्ताहिक पोलीस तपासतर्फ़े त्यांचा सत्कार करण्यात आला.
रायगड जिल्यातील गोरेगाव पोलीस ठाणे मधील पोलीस निरीक्षक श्री अनिल टोम्पे व सर्व सहकार्यांचे अभिनंदन करून या "कोरोना विषाणू "पासून ( कोरोना पॉजिटीव्ह ) होऊन पूर्णपणे बरे होऊन ताबडतोब कामावर रुजू झालेले Asi लालासाहेब जगन्नाथ कोळेकर, पो. ह. वा /1142 सुनिल गोविंद शिवाजी खंदारे, पोना /1334 उमेश रमेश पवार, पोना /1495 सतिश शिवाजी कदम, मपोना/108 रिना अजिंक्य गोसावी पोशि / 1874, सुग्रीव उद्धवराव मुंडे यांचे कौतुक करून साप्ताहिक पोलिस तपासचे राहुल एस. देशमुख, क्राईम महाराष्ट्र प्रतिनिधी यांनी गोरेगाव पोलीस ठाणे मधील पोलीस योद्ध्यांना सन्मानपत्र देऊन त्यांचे अभिनंदन केले.

0 टिप्पण्या