खाली डोकं वर पाय
मुंबई, दादासाहेब येंधे : दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक जीवघेणा व्हिडिओ व्हायरल झाला होता. उंच इमारतीवर एक तरुण मृत्यूला आमंत्रण देणारा स्टंट करत असल्याचे व्हिडिओ मध्ये दिसत होते. याबाबत मुंबई पोलिसांकडे काही जणांनी तक्रार केली होती.
मुंबईतील कांदिवली येथील लालजी पाडा विभागातील जय भारत सोसायटीच्या २२ व्या मजल्यावर एक तरुण स्टंट करत होता. तर त्याचे दोन साथीदार हा व्हिडीओ शूट करत होते. सदर तरुण हा २२ व्या मजल्याच्या कठड्यावर स्टंट करत होता. तो आपल्या दोन्ही हातावर उभा राहिला होता. मृत्यूला आमंत्रण देणारा हा व्हिडिओ असल्याने मुंबई पोलिसांनी त्या तरुणाचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे.

0 टिप्पण्या