Ticker

6/recent/ticker-posts

बत्ती गुल!

मुंबईसह ठाणे, नवी मुंबईत वीजपुरवठा खंडीत व्यवहार कोलमडले

मुंबई, दादासाहेब येंधे : कधीही थांबणारी मुंबई सोमवारी सकाळी वीजपुरवठा खंडित झाल्याने ठप्प झाली. आज सकाळीच वीज वाहिनीत बिघाड झाल्याने मुंबई शहरासह उपनगरे, ठाणे आणि नवी मुंबईच्या परीसरात रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा खंडित झाला होता.

आठवड्याच्या सुरुवातीला अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने कोरोनामुळे सुरू असलेल्या ऑनलाईन शाळा, वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन मिटींग्स यांना ब्रेक लागला. तर मुंबईची लाइफलाईन असलेली रेल्वे सेवादेखील सुमारे अडीच ते तीन तास ठप्प झाली होती. विजेअभावी बँकिंग व्यवहार कोलमडले तर एटीएमही बंद पडले होते. रस्त्यावरील सिग्नल देखील बंद पडल्याने अनेक ठिकाणी वाहतूककोंडी झाली होती.

कळवा-तळेगाव (पॉवरग्रीड) वाहिनी १० ऑक्टोबरला दुपारी वाजून ४७ मिनिटाला या  वाहिनीचा कंडक्टर तुटल्यामुळे बंद झाली होती. तिचे काम सुरू होते. सोमवारी सकाळी १० वाजून मिनिटांनी ४०० केव्ही पडघा-कळवा वाहिनी- मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने बंद झाली आणि मुंबईची वीजव्यवस्था आयलँडिंगवर गेली. त्याचवेळेस टाटा पॉवरचे ५०० मेगावॅट आणि अदानीचे २५० मेगावॅटचे डहाणू येथील वीजनिर्मिती संच बंद झाल्यामुळे मुंबईतील वीजपुरवठा बाधित झाला होता.

मुंबईसह ठाण्यातही वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर पाणीपुरवठ्यावर परिणाम झाल्याचे दिसून आले. दुपारनंतर टप्याटप्याने काही भागांचा वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतरही संपूर्णतः पूर्वस्थितीवर येण्यास सायंकाळी उशिरापर्यंत वाट पाहावी लागली.


कांदिवली पेट्रोल पंप 



सीएसएमटी रेल्वे स्टेशन 

सीएसएमटी रेल्वे स्टेशन 

सीएसएमटी रेल्वे स्टेशन 

बोरिवली स्थानक 

मध्य रेल्वे, मस्जिद बंदर 

सीएसएमटी रेल्वे स्टेशन 



नक्षत्र मॉल, दादर 

मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक

ट्राफिक जॅम 

नायर हॉस्पिटल 

प्रभादेवी रेल्वे स्थानक  ट्रेन नसल्यामुळे प्रवाशांचे हाल 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या