Ticker

6/recent/ticker-posts

कोरोना रोखण्यासाठी 'माझे कुटुंब - माझी जबाबदारी' मोहीम

मुंबई, दादासाहेब येंधे : कोविड-१९ विपाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होत आहेत. असे असले तरी कोरोनावर हमखास असा तोडगा सापडून त्याच्यावर संपूर्ण नियंत्रण येईपर्यंत आता जीवनशैलीमध्ये काही बदल करणे सर्वांनाच आवश्‍यक झाले आहे. मास्कचा उपयोग, सुरक्षित अंतर, निर्जंतुकीकरणाचा वापर याच्यापलीकडे जाऊन आता वैयक्तिक, कौटुंबिक तसेच सार्वजनिक जीवनात नवीन बदलांचा अवलंब करणे गरजेचे आहे. अशा बदलांचा स्वीकार करून, त्या माध्यमातून कोरोनावर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी संपूर्ण राज्यभरात 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी ' हि मोहीम दि. १५ सप्टेंबर २०२० पासून राबविण्यात येत आहे.


सर्व नागरिकांनी लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने व स्वयंसेवी संस्थांच्या सहभागाने राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत प्रभावी कोविड नियंत्रणासाठी नवीन जीवनशैली पद्धतीचा अवलंब करण्यास अधिकाधिक व्यक्‍तींना प्रेरित करणे, हा या मोहिमेचा मुख्य भाग आहे. कोविड नियंत्रणासाठी अधिक प्रभावी आरोग्य शिक्षण साधणे, हे त्याचे मुख्य उदिष्ट आहे. या मोहिमेत आरोग्य स्वयंसेवकानी घरोघरी जाऊन लोकांची प्राणवायू व ताप तपासणी करणे, नागरिकांना आरोग्य शिक्षणासह महत्वाचे आरोग्य संदेडा देणे , कोविड -१९ चे संशयित रुग्ण शोधणे , उपचारासाठी संदर्भ सेवा देणे या बाबी राबविल्या जाणार आहेत. मधुमेह, हृदयविकार, मूत्रपिंड (किडनी) विकार , लठ्ठपणा यासारखे आजार
असणाऱ्या व्यक्‍तींना शोधून काढणे व उपचारासाठी संदर्भ सेवा या बाबींचाही या मोहिमेत समावेडा असणार आहे. मोहिमेच्या एकूण कालावधी दरम्यान साधारणपणे दोन वेळा आरोग्य स्वयंसेवक प्रत्येक कुटुंबाला भेटणार आहेत. कुटुंब म्हणून आवश्‍यक असलेली काळजी घरातील सर्व सदस्यांनी घ्यावी, कोरोनापासून बचावासाठी आवश्‍यक असलेली पथ्य पाळताना अनवधानाने चूक होत असल्यास ती एकमेकांच्या निदर्शनास आणून द्यावीत हा यातील महत्वाचा भाग आहे .याअनुपंगाने मार्गदर्शक सुचना निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

 











टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या