अतिवृष्टीने मुंबई पुन्हा तुंबली
मुंबई, दादासाहेब येंधे : मुंबईसह उपनगरांत मंगळवारी रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसाने बुधवारी सकाळी मुंबई तुंबली. मंगळवारी मध्यरात्रीसह बुधवारी पहाटे पावसाचा जोर कायम राहिल्याने रस्ते, रेल्वे लाईन आणि इतरत्र ठिकठिकाणी पाणी साचले होते. याचा विपरीत परिणाम रस्ते वाहतुकीसह रेल्वे वाहतुकीवरही झाला.
बऱ्याच वस्त्यांमध्ये पाणी शिरले. सकाळी आपले कार्यालय गाठणाऱ्या चाकरमान्यांची मोठी कोंडी झाली. दादर टीटी सर्कल, परळ, सायन, नानाचौक, हिंदमाता, बावला कंपाउंड, चिंचपोकळी, लालबाग, वडाळा, वरळी, दहिसर, मालाड सबवे, अंधेरी मार्केट, मिलन सबवे, वाकोला येथे मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले होते.





0 टिप्पण्या