उत्तरप्रदेश राज्यातील कुख्यात मिर्ची गॅगच्या म्होरक्यास मुंबईत जेरबंद
मुंबई, दादासाहेब येंधे : सप्टेंबर २०१९ मध्ये धौलाना पोलीस ठाणे (जिल्हा- हापुड, उत्तर प्रदेश) चे हद्दीत कुविख्यात मिर्ची गँगचे म्होरक््याने व त्याचे साथीदारांनी दिवसा ढवळया चारचाकी वाहनातुन येवुन गोळीबार करून भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक नेता राकेश शर्मा, वय ३७ वर्षे याची गोळया मारुन दुर्दम हत्या केली होती. त्याबाबत धौलाना पोलीस ठाणे (जिल्हा- हापुड, उत्तर प्रदेश) येथे गुन्हा नों. क्र. ३६१/२०२०, कलम ३०२, १२०(ब) भादंवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
तसचे जानेवारी २०२० मध्ये फेज-३, नोएडा पोलीस ठाणे हद्दीत नोएडा स्थित प्रसिध्द उद्योगपती गौरव चांडेल, वय ४५ वर्षे यांची कुविख्यात मिर्ची गॅगचे म्होरक्याने व त्याच्या साथीदारांनी डोक्यात गोळी मारुन हत्या केली व त्याची किया सेल्डोज कंपनीची कार जबरीने चोरुन नेली होती. त्याबाबत फेज-३, नोएडा पोलीस ठाणे येथे गु.र.क्र. ११/२०२० कलम ३०२, २०१ भादंवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
मिर्ची गँग ही गुन्हयांकरीता जबरीने चोरलेल्या वाहनांचा वापर करत असे. मिर्ची गँगच्या सततच्या गुन्हेगारी कारवायांमुळे सदर म्होरक्यास व त्याचे साथीदारांना पकडण्यासाठी उत्तरप्रदेश पोलीसांनी २,५०,०००/- रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. सदर गुन्हयामध्ये गोळीबार करणारा मिर्ची गँगचा म्होरक्या हा गुन्हा केल्यानंतर पंजाब, हरीयाना, दिल्ली, महाराष्ट्र् अशा वेगवेगळया राज्यात अस्तित्व लपवून रहात होता. त्याकरीता उत्तरप्रदेश पोलीसांनी सदर राज्यांत जाऊन, वेगवेगळया धडक मोहीमा राबवून त्यास पकडण्याचे अनेकदा प्रयत्न केले होते, परंतु मुख्य आरोपी हा त्यांना सतत गुंगारा देवून पळून जाण्यात यशस्वी होत असे.
उत्तर प्रदेश गुन्हे शाखेचे पथक हे सदर आरोपीचा शोध घेणेकामी मुंबई येथे आले होते. त्या अनुशंगाने वरिष्ठांनी सदर आरोपीचा शोध घेण्याबाबतच्या सूचना कक्ष ११, गुन्ह प्रकटीकरण शाखेस दिल्या
होत्या. तपासात गुन्हयातील मुख्य पाहिजे आरोपीं हा नाव व वेश बदलून लपून छपून मुंबई मध्ये वेगवेगळया ठिकाणी मागील काही महिन्यांपासुन राहत असल्याची विश्वसनीय माहिती कक्ष ११, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि झिने यांना मिळाली. त्यानुसार सदर माहिती मा.वरिष्ठांना देण्यात आली. मा. वरिष्ठांनी केलेल्या मार्गदर्शना नुसार, कक्ष-११ चे प्र.पो.नि. सुनिल माने यांच्या पर्यवेक्षणाखाली सपोनि झिने व पथकाने एकता नगर (कांदविली पश्चिम), बेहराम बाग (जोगेश्वरी पश्चिम), हरला मार्केट/प्रेमनगर (विले पार्ले पश्चिम) परिसरात पाळत ठेवली होती. खास बातमीदारांनी दिलेल्या माहितीची शहानिशा करून पथकाने अहोरात्र मेहनत करून मानवी कौशल्याचा वापर करुन सदर पाहिजे आरोपी इसमाच्या हालचालींचा वेध घेवून त्यास दि.०५/०९/२०२० रोजी इरला मार्केट/प्रेमनगर (विले पार्ले, पश्चिम) परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या तपासात त्याने उपरोक्त दोन्ही गुन्हे केल्याची व सदर गुन्हयात अटक होवू नये म्हणून मागील एक वर्षापासून तो नाव व वेशांतर करुन पंजाब, हरीयाना, दिल्ली, महाराष्ट्र येथे राहत होता अशी माहीती दिली.
अटक मुख्य आरोपी हा उत्तरप्रदेश, दिल्ली परिसरातील कुख्यात गुन्हेगार असून, तो मिर्ची गँग नांवाने कुप्रसिध्द टोळी चालवित आहे. या टोळीने अनेक गंभीर अपराध केलेले आहेत व गुन्हेगारी
काखवायंमध्ये सक्रीय असल्याची माहीती मिळाली आहे. सदर टोळीच्या सततच्या गुन्हेगारी कारवायांमुळे समाजात वाढलेली भिती पाहून त्यास वेळीच पकडण्यासाठी उत्तरप्रदेश पोलीसांनी अडीच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केलेले आहे. सदर मुख्य आरोपी विरुध्द उत्तरप्रदेश राज्यातील बुलन्द शहर, भोजपूर, कविनगर, मुंडा पाडे, पिल्खुवा, बाबुगढ, घौलाना, हापुडनगर, फेज-३ या विविध पोलीस ठाण्यांमध्ये खून, खूनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दरोडा, चोरी, अग्शिस्त्राचा वापर, गुन्हेगारी टोळी चालविणे वगैरे स्वरुपाचे १९ गंभीर गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपीस अटक करुन गुन्हे शाखा हापुड, उत्तरप्रदेश यांच्या ताब्यात पुढील कायदेशीर कारवाईकरीता दिले आहे.
अटक आरोपी :-
१) प्रविण उर्फ आशु उर्फ आकाश राजेंद्र सिंग, वय ३२ वर्षे, व्यवसाय- फळ विक्रेता, रा.ठी. आलुवाडी, इर्ला
मार्केट, प्रेम नगर, विलेपार्ले पश्चिम, मुंबई.
( मूळ गाव- काझीपुरा, पोस्ट- दालना, थाना- मसूरी, ता. जि. गाजियाबाद, उत्तरप्रदेश.)
कक्ष ११, गुन्हे प्रकटीकरण शाखा, गुन्हे अन्वेषण विभाग, मुंबईचे पथकाने अथक प्रयत्न करुन, अहोरात्र मेहनत घेवून तांत्रिक माहीती व मानवी कौशल्याचा अचूक वापर करुन खूनाच्या गुन्हयातील मुख्य सूत्रधार आरोपीस पकडून कायदेशीर कारवाई केलेली आहे.
सदरची यशस्वी कामगिरी मा. सह पोलीस आयुक्त (गुन्हे), श्री. मिलिंद भारंबे, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. विरेश प्रभु, मा. पोलीस उप-आयुकत (प्र-१), श्री. अकबर पठाण, स. पो. आयुक्त (प्र-उत्तर), श्री. अविनाश शिंगटे यांच्या मागदर्शनाखाली प्रभारी पोनि सुनिल माने, पोनि रईस शेख,सपोनि शरद झिने, नितीन उतेकर, विशाल पाटील तसेच अंमलदार अविनाश शिंदे, रविंद्र भांबिड, दिपक कांबळे, नितीन शिंदे, राजेश चव्हाण, संतोष माने, राकेश लोटणकर, जयेश केणी, अजित चव्हाण, पो.ह.चा.मो रे यांनी पार पाडली आहे.नि. सुनिल माने, पोनि रईस शेख,स पोनि शरद झिने, नितीन उतेकर, विशाल पाटील तसेच अंमलदार अविनाश शिंदे, रविंद्र भांबिड, दिपक कांबळे, नितीन शिंदे, राजेश चव्हाण, संतोष माने, राकेश लोटणकर, जयेश केणी, अजित चव्हाण, पो.ह.चा.मोरे यांनी पार पाडली आहे.
सदरची यशस्वी कामगिरी मा. सह पोलीस आयुक्त (गुन्हे), श्री. मिलिंद भारंबे, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. विरेश प्रभु, मा. पोलीस उप-आयुकत (प्र-१), श्री. अकबर पठाण, स. पो. आयुक्त (प्र-उत्तर), श्री. अविनाश शिंगटे यांच्या मागदर्शनाखाली प्रभारी पोनि सुनिल माने, पोनि रईस शेख,सपोनि शरद झिने, नितीन उतेकर, विशाल पाटील तसेच अंमलदार अविनाश शिंदे, रविंद्र भांबिड, दिपक कांबळे, नितीन शिंदे, राजेश चव्हाण, संतोष माने, राकेश लोटणकर, जयेश केणी, अजित चव्हाण, पो.ह.चा.मो रे यांनी पार पाडली आहे.नि. सुनिल माने, पोनि रईस शेख,स पोनि शरद झिने, नितीन उतेकर, विशाल पाटील तसेच अंमलदार अविनाश शिंदे, रविंद्र भांबिड, दिपक कांबळे, नितीन शिंदे, राजेश चव्हाण, संतोष माने, राकेश लोटणकर, जयेश केणी, अजित चव्हाण, पो.ह.चा.मोरे यांनी पार पाडली आहे.



0 टिप्पण्या