Ticker

6/recent/ticker-posts

आई द्रोणागिरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

 शिबिरात ६६ रक्तदात्यांनी रक्तदान करून बजावली मोलाची भूमिका

उरण : सालाबादप्रमाणे सहाव्या वर्षी मंडळाच्या वतीने साखरचौथीच्या बाप्पाची अडीच दिवसांसाठी स्थापना करण्यात आली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताची गरज असलेल्या रुग्णांचे जीव संकटात असताना रक्ताची अडचण दूर करण्याचा उद्देशाने राज्य सरकारने सांगितलेल्या सोशल डिस्टन्स व सॅनिटायझर चा वापर या नियमांचे पालन करून, सामाजिक बांधिलकी म्हणून समर्पण ब्लड बँक, घाटकोपर च्या सहकार्याने आयोजित रक्तदान शिबिरात ६६ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
     शिबिराचे उद्द्घाटन  विद्यमान ग्रामपंचायत सदस्या कल्पनाताई पाटील यांनी स्वतः रक्तदान करून केले, त्यांच्या समवेत मंडळाचे अध्यक्ष राजेश गावंड आणि सर्व पदाधिकारी समर्पण ब्लड बँकेच्या पी.आर.ओ. दर्शना उपाध्याय आणि डॉ. पल्लवी जाधव उपस्थित होत्या.
   या अगोदरही सामाजिक बांधिलकी जोपासताना पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या वारसांना ३५,०००/- ची आर्थिक मदत, द्रोणागिरी मातेच्या मंदिरावर विद्युत रोषणाई आणि रस्त्याचे नामकरण करणाऱ्या आई द्रोणागिरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मार्फत रक्तदान शिबिर राबवून सर्व रक्तदाते आणि सामाजिक कार्यकर्ते यांना थर्मास भेट देऊन सन्मानित करण्यातआले.
     रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष- राजेश गावंड, उपाध्यक्ष- सागर डाऊर, कार्याध्यक्ष- केदार गायकर, सचिव- प्रणय थळी, खजिनदार- रितेश करंजेकर, सहखजिनदार- गणेश थळी, या पदाधिकाऱ्यांच्या बरोबरच सर्व सदस्यांनी मेहनत घेतली.
     शिबिरातील सर्व कार्यक्रमाचे निवेदन आणि सूत्रसंचालन  सुनिल वर्तक यांनी केले. समर्पण ब्लड बँकेच्या वतीने दर्शना उपाध्याय यांनी आयोजक आई द्रोणागिरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या सर्व सदस्यांचे आणि रक्तदात्यांचे मनापासून आभार मानले.












टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या