पोलिसांच्या कुटुंबियांना मदत
मुंबई, दादासाहेब येंधे : लालबागचा राजाच्या दर्शनासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात गर्दी होते यंदा मात्र मंडळाने उत्सव रद्द करून आरोग्य उत्सवाला गर्दी करीत भक्तांनीही आगळावेगळा विक्रम केला आहे.
मंडळाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात तब्बल दहा हजाराहून अधिक भक्तांनी रक्तदान केले असून २४६ जणांनी प्लाझ्मादान करीत मोलाची भूमिका बजावली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने उत्सव रद्द करीत ४ ते ३१ ऑगस्टच्या काळात आरोगयोत्सव साजरा करण्याचे ठरविले होते. त्यानुसार २२ ऑगस्ट पासून सुरू झालेल्या रक्तदान शिबिरात एकूण १० हजाराहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे.
0 टिप्पण्या