वन्यजीवांना जीवदान
मुंबई, दादासाहेब येंधे : मुलुंड येथे एका घराशेजारी रहिवाशांना एक रंग बदलणारा सरडा निदर्शनास आला होता. त्यांनी त्वरित पॉज संस्थेला संपर्क साधला. यावेळी संस्थेचे स्वयंसेवक हसमुख वळंजू तातडीने घटनास्थळी पोचले व सरड्याला वाचवले. यानंतर भांडुप येथे एका घराशेजारी असणाऱ्या झाडांवर कमेलियॉन निदर्शनास आला व त्याला काही कावळे टोचत असलयाचे तेथील रहिवाशांनी पाहिले. याची माहिती मिळताच स्वयंसेवक हितेश यादव हे घटनास्थळी पोहोचले व त्या सरड्याला वाचवले.
बोरवली येथून एका घरातून एका घोरपडीची सुटका करण्यात आली. तसेच बोरिवली येथून एका घराच्या आवारातुन दोन अजगरांची सुटका करण्यात आली. तर मिरा रोड येथून एका अजगराची सुटका करण्यात आली. सर्पमित्र सिद्धेश आणि अभिजीत सावंत यांनी त्यांची सुटका केली. वाचलेल्या सर्व वन्यजीवांना वन विभागाला कळवून त्यांना निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आल्याची माहिती वन्यजीव रक्षक आणि संस्थेचे पॉज- मुंबई चे संस्थापक मनीष सुब्रमण्यम यांनी सांगितले.
0 टिप्पण्या