'क्यूआर' कोड आधारित ओळखपत्र दाखवा, स्थानकात प्रवेश मिळवा
मुंबई, दादासाहेब येंधे : मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना 'क्यूआर कोड' तपासूनच प्रवेश देण्याचा निर्णय लागू केला आहे. राज्य सरकारने अजून पर्यंत सर्वच कर्मचाऱ्यांना 'क्यूआर कोड' आधारित ओळखपत्र वाटली नसल्याने त्यांना या निर्णयातून सूट असली तरी हळूहळू क्यूआर कोड बंधनकारक करण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक गोयल यांनी स्पष्ट केले आहे. राज्य सरकारने मागणी केल्यास सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरु करण्यात येईल त्या आधी स्टॅंडर्ड ऑपरेशन प्रोसिजर 'एसओपी' जारी करण्यात येईल असेही गोयल यांनी यावेळी सांगितले.

अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांची ओळखपत्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशिष्ट अंतर राखून तपासणे शक्य व्हावे यासाठी रेल्वेने राज्य सरकारच्या मदतीने 'क्यूआर कोड' आधारित ई- ओळखपत्र जारी करण्याचा निर्णय घेतला होता. सरकारी आस्थापणांकडून ही ओळखपत्रे वाटण्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नसले तरी सीएसएमटी रेल्वे स्थानकावर क्यूआर कोडची तपासणी पोलिसांमार्फत सुरू केली असून हळूहळू ती शंभर टक्के बंधनकारक करण्यात येणार असल्याचे समजते.

0 टिप्पण्या