लोकल अभावी रस्त्यावर गर्दी
मुंबई, दादासाहेब येंधे : राज्य सरकारने खाजगी कार्यालयांतील उपस्थितीची मर्यादा १५ टक्क्यांवरून ३० टक्क्यांपर्यंत वाढविण्यास परवानगी दिली असली तरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आजही तोकडीच आहे. रेल्वेसेवा अद्यापही अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना पुरतीच मर्यादित असल्याने अतिरिक्त गर्दीचा भार रस्ते वाहतुकीवर प्रचंड प्रमाणात पडताना दिसत आहे. तसेच लॉक डाऊनच्या शिथिलीकरणानंतर सुरू असलेली नोकरदारांची प्रवासकोंडी वाढली असून, ती आता नकोशी होऊ लागली आहे.
सध्या मध्य आणि पश्चिम रेल्वेतून अत्यावश्यक सेवेतील तीन लाख ७४ हजार कर्मचारी प्रवास करत आहेत. खाजगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना व अन्य प्रवाशांनाच रेल्वे प्रवासाची मुभा नसल्याने त्यांना एसटी, बेस्टवरच अवलंबून राहावे लागते. कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, कर्जत, कसारा, पनवेल, विरार, नालासोपारा येथून प्रवासी मुंबईच्या वेशीवर एसटीने येतात आणि पुढे बेस्टच्या बसने प्रवास करीत कार्यालय गाठतात. यात अनेकांचे दिवसाचे चार ते सहा तास प्रवासातच जातात. त्यामुळे लवकरात लवकर लोकल सेवा सुरू करावी अशी मागणी लोकल प्रवासी करीत आहेत.

0 टिप्पण्या