लाडक्या गणरायाचे घरोघरी आगमन - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

शनिवार, २२ ऑगस्ट, २०२०

लाडक्या गणरायाचे घरोघरी आगमन

कोरोनाचे संकट... पण उत्साह कायम

मुंबई, दादासाहेब येंधे : भाविक मंडळी वर्षभर ज्या गणरायाची आतुरतेने वाट पाहत असतात त्या लाडक्या गणरायाचे आज घरोघरी आगमन झाले. भल्या पहाटेपासूनच सर्वत्र विघ्नहर्त्याच्या आगमनाची धावपळ सुरू होती. यावर्षी कोरोना महामारीचे संकट गणेशोत्सवावर असले तरी भक्तांचा उत्साह कमी झालेला दिसत नव्हता. 

Covid-19 मुळे यावर्षी ढोल-ताशे, तुतारे यांचा गोंगाट नसला तरी शांततामय वातावरणात 'गणपती बाप्पा मोरया...'चा गजर करत बाप्पाचे घरोघरी आगमन झाले. 

काही घरात चार-चाकी वाहनातून तर काही ठिकाणी रिक्षा व दुचाकीवरून बाप्पा आणले जात होते. तर काही ठिकाणी भक्तांच्या डोक्यावर बसून बाप्पा आले. एकूणच आनंदमयी वातावरणात, शांततेत आणि सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळले जातानाचे चित्र दिसत होते.


1 टिप्पणी:

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज