९५.३० टक्के विद्यार्थी दहावी परीक्षेत उत्तीर्ण
मुंबई, दादासाहेब येंधे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत ९५.३० टक्के परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत निकालात १८.२० टक्के वाढ झाली आहे तसेच सीबीएसई आणि आयसीएसई चा निकाल ही ९५ टक्क्यांच्या पार लागल्यामुळे नामांकित कॉलेजमध्ये प्रवेशासाठी चांगलीच चुरस पाहावयास मिळणार आहे.
0 टिप्पण्या