राणीबागेतून सोशल मिडियाद्वारे शक्ती वाघाचा रुबाब
मुंबई, दादासाहेब येंधे : व्याघ्रदिनानिमित्त भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालयात साकारलेल्या विशेष जंगलात विहार करणाऱ्या 'शक्ती' वाघाच्या लीलांचे लाईव्ह दर्शन बुधवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून मुंबईकरांना घडविण्यात आले.
कोरोना सारख्या महामारीमुळे मुंबईत लॉक डाऊन असल्याने राणीच्या बागेतही पर्यटकांना येण्यास मनाई आहे. मात्र, व्याघ्र दिनानिमित्त या रुबाबदार प्राण्याचे दर्शन मुंबईकरांना व्हावे, यासाठी महापालिकेने सोशल मीडियाचा आधार घेत बुधवारी ४.३० वाजता सोशल नेटवर्क साइटद्वारे मुंबईकरांना घरबसल्या लाईव्ह दर्शन घडवण्यात आले.
0 टिप्पण्या