Ticker

6/recent/ticker-posts

राफेलचे पहिले स्वागत मुंबईतून

राफेल लढाऊ विमाने अखेर भारतात दाखल
मुंबई: राफेल विमानांचा पहिला ताफा बुधवारी अखेर अंबाला हवाई तळावर दाखल झाला. या पाचही विमानांचे भारतीय आकाशातील पहिले स्वागत मुंबईतून झाले. पश्चिम नौदल कमांडच्या मुंबईस्थित युद्धनौकेने यासंबंधीचा स्वागत संदेश वैमानिकांना दिला.

मुख्य म्हणजे त्यानंतर ही पाचही विमाने महाराष्ट्र-गुजरात सीमेवरुन पुढे गेली. फ्रान्सकडून ३६ रायफल राफेल विमाने खरेदी करण्याचा करार भारताने केला आहे. त्यापैकी ५ विमाने सोमवारी फ्रान्सहून उडाली होती. युएईतील हवाई तळावर थांबा घेऊन ही विमाने बुधवारी सकाळी अरबी समुद्रावरून भारतात दाखल झाली. त्यावेळी अरबी समुद्र व हिंदी महासागराच्या सीमेवर गस्तीवर असलेल्या पश्चिम नौदल कमांडमधील आयएनएस कोलकाता या पाणबुडीने  विमानांच्या मुख्य वैमानिकांची संवाद साधत त्यांना सुरक्षित व आनंदी उड्डाणाच्या शुभेच्छा दिल्या.

या पाचही लढाऊ विमानांनी महाराष्ट्र-गुजरात सीमेवरून भारताच्या मुख्य भूमीवरील अवकाशात प्रवेश केला. त्यावेळी पुण्याहून आलेल्या दोन सुखोई लढाऊ विमानांनी राफेलला संरक्षण दिले. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता ही पाचही विमाने अंबाला हवाई तळावर उतरली. हवाई तळावर विमानांना परंपरेनुसार जलतोफांनी सलामी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संस्कृत श्लोक ट्विट करीत राफेल विमानांचे स्वागत केले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या