छत्रपती शिवाजी महाराज स्थानकावर एव्हीएम
स्वयंचलित मशिनद्वारे मिळणार माफक दरात मास्क, सॅनिटायझर
मुंबई, दादासाहेब येंधे : कोरोना संकटकाळात मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या स्थानकावर स्वयंचलित वेंडींग मशीन कार्यान्वित केली आहे. त्यामध्ये मास्क, सॅनिटायझर आणि ग्लोव्हज उपलब्ध आहेत.
प्रवाशाला नवीन मास्क आणि ग्लोव्ह्जची आवश्यकता असेल तर covid-19 प्रतिबंधात्मक स्वयंचलित वेंडींग मशीन डिस्पेंसर मधून त्वरित मिळवता येतील अशी व्यवस्था यात करण्यात आली आहे. नाममात्र किमतीत ट्रिपल प्लाय मास्क, हँड सॅनिटाझर बाटली आणि ग्लोव्हज देण्यात येतील.
हे एव्हीएम नवीन इनोव्हेटिव्ह नॉन फेअर रेव्हेन्यू आयडिया स्कीम अंतर्गत इतरही स्थानकांवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आरोग्य मंत्रालयाने रेल्वे प्रवाशांसाठी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, रेल्वे गाड्यांमधून प्रवासादरम्यान सर्व प्रवाशांना मास्कचा वापर करणे गरजेचे आहे.


0 टिप्पण्या